बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवारी महाराष्ट्र बंद राहुरी तालुका बंदमध्ये सहभागी होणार आ.प्राजक्त तनपुरे यांची माहिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवारी महाराष्ट्र बंद राहुरी तालुका बंदमध्ये सहभागी होणार आ.प्राजक्त तनपुरे यांची माहिती

  राहुरी/वेबटीम:- बदलापूर येथील अमानवी घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून या बंदमध्ये राहुरी तालुका सहभा...

 राहुरी/वेबटीम:-

बदलापूर येथील अमानवी घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून या बंदमध्ये राहुरी तालुका सहभागी होणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

 बदलापूर येथे एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाले. या घटनेचा राज्यातील सर्वच नागरिकांनी निषेध केला. राज्य सरकारचा नाकर्तेपणा  व गृह खात्याचा हलगर्जीपणा यामुळे संतापाची लाट उसळली. राज्यभरात ठिकठिकाणी निषेधाचा संतप्त सुर उमटला. विशेषतः महिला वर्गांनी आक्रमक भूमिका घेत तहसीलदार व पोलीस ठाण्यावर विविध संघटनांनी निषेध मोर्चा काढून निवेदने दिली. 

याच पार्श्वभूमीवर संबंधित पीडित बालिकेला न्याय मिळावा म्हणून उद्या शनिवारी महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला असून यात राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचाही समावेश राहिल असे आमदार तनपुरे यांनी सांगितले. 

राहुरीतील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे व निषेध नोंदवावा असे श्री तनपुरे यांनी नमूद केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत