श्रीरामपूर(वेबटीम) रक्षाबंधन हा केवळ सण नसून ती एक परंपरा आहे. याच परंपरेतून समाजामध्ये सलोखा निर्माण होऊ शकतो. असा आशावाद विद्यालयाचे चे...
श्रीरामपूर(वेबटीम)
रक्षाबंधन हा केवळ सण नसून ती एक परंपरा आहे. याच परंपरेतून समाजामध्ये सलोखा निर्माण होऊ शकतो. असा आशावाद विद्यालयाचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत कुंकूलोळ यांनी व्यक्त केला. ते शा. ज. पाटणी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व स्काऊट गाईड आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सहाय्यक महसूल अधिकारी अशोक नरोड, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष व पत्रकार संदीप पाळंदे, मनसेचे शहराध्यक्ष लखन इंगळे, शहर सरचिटणीस नितीन जाधव, हिंद सेवा पतपेढीचे संचालक महेश डावरे, मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे, पर्यवेक्षिका रश्मी कासार हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जोंधळे, अध्यक्षीय सूचना ज्ञानेश्वर लकडे व अनुमोदन प्रसाद ब्राह्मणे यांनी दिले. पाहुण्यांच्या परिचय प्रकाश कळमकर यांनी करून दिला. स्नेहल गाडेकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील कैलास जेजुरकर, अनुप्रीती पवार, उर्मिला पुजारी, सुयश मकासरे, मारुती शिंदे, गणेश नागपुरे, राकेश शिंदे, संतोष एडके, दिनेश मुळे, नितीन यशवंत, किरण पुंड, संगीता वराळे, बाबासाहेब औटी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत