पानेगांव (वार्ताहर)- जवळपास तीन आठवड्यांचा विश्रांतीनंतर सुरू झालेल्या श्रावण सरीने धुव्वाधार पाऊसानं रौद्र रूप धारणं करत नेवासे, राहुरी ता...
पानेगांव (वार्ताहर)-
जवळपास तीन आठवड्यांचा विश्रांतीनंतर सुरू झालेल्या श्रावण सरीने धुव्वाधार पाऊसानं रौद्र रूप धारणं करत नेवासे, राहुरी तालुक्यातुन वाहत असलेल्या शेतकऱ्यांची माई म्हणून परिचित असणाऱ्या मुळाथडी परीसराला वरदान ठरलेल्या दोन दिवसाच्या धुव्वाधार पाऊसानं मुळानदी दुथडी भरून वाहू लागली. सुरुवातीला देव नदीचं पाणी मुळाधरण २४ टीएमसी पेक्षा जास्त झाल्याने मुळा पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाऊसानं मुळा धरणातून दुसऱ्यांदा दरवाजे उघडून दोन हजार क्यूसचने पाणी मुळानदी पात्रात सोडण्यात आले त्याच बरोबर सुरुच असलेला धुव्वाधार पाऊस त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. असाचं पाऊस सुरु राहिला तर आणखी मुळाधरणातुन पाणी जायकवाडीच्या दिशेने पाणी प्रवाहित होणार आहे. त्याचबरोबर दोन दिवसांपासून सुरू असलेल्या
वादळीवाऱ्यानं निंभारी, करजगांव,पानेगांव, अंमळनेर,शिरेगांव, वाटापूर,तामसवाडी, खेडलेपरमानंद ,गोणेगांव खुपटी गणेशवाडी आदी गावातील झालेला पाऊसानं मुळाथडीपरीसरातील ऊस ,कपाशी, मका, घास ,सोयाबीन पिकं झोपली आहे.
शेतकरी वर्गातून प्रत्यक्षपाहणी करत महसूल, कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी मुळाचे संचालक संजय जंगले, निंभारी सरपंच आप्पासाहेब जाधव, यमाजी जाधव, काकासाहेब पवार अंमळनेर सरपंच ज्ञानेश्वर आयनर, उपसरपंच अशोकराव मोरे,माजी सरपंच अच्युतराव घावटे,करजगांवचे उपसरपंच सतिश फुलसौंदर,माजी सरपंच चंद्रकांत टेमक, आशुतोष माकोणे, कैलास बाचकर वाटापूरचे सरपंच विनायक माकोणे, भिकाजी जगताप तामसवाडीचे सरपंच चंद्रकांत जगताप, सारंग फोफसे शिरेगांवचे सरपंच निरंजन तुवर, उपसरपंच भगिरथ जाधव परमानंद जाधव, दिगंबर जाधव माजी सरपंच किरण जाधव,कर्णासाहेब जाधव, विठ्ठल जाधव जोर धरू लागली आहे.
दोन दिवसाच्या धुव्वाधार पाऊसानं मुळानदी दुथडी भरून वाहू लागल्याने आनंद होत असून वादळीवाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांच प्रचंड नुकसान झाले आहे संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करावे अन्यथा आमदार शंकरराव गडाख, लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांचा मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात येईल.
- दत्तात्रय घोलप- पानेगांव उपसरपंच,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत