मुंबई/वेबटीम:- लोकसभा निवडणुका संपताच महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असतानाच महाविकास आघाडी व महायुतीमध्ये उमेद...
मुंबई/वेबटीम:-
लोकसभा निवडणुका संपताच महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असतानाच महाविकास आघाडी व महायुतीमध्ये उमेदवारांसाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.कोणत्या मतदारसंघात कोणाचा उमेदवार यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून चाचपणी सुरू आहे.
यामध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यांच्यासाह असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे.
यावेळी त्यांच्या समवेत साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे,उद्योजक ऋषभ लोढा, उद्योजक दत्तात्रय दरंडले, माजी नगसेवक डॉ.संदीप मुसमाडे, अजित येवले,प्रकाश सोनी, दत्तात्रय साळुंके, अतुल त्रिभुवन, नितीन डमाळे, साई त्रिभुवन, पंकज हारदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत