देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्यावतीने हर घर तिरंगा अभियान व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत 'विरो क...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्यावतीने हर घर तिरंगा अभियान व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत 'विरो को वंदन' व 'कवी संमेलनाचा' बुधवार दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन, देवळाली प्रवरा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, शहीद जवान शहीद पोलीस यांच्या वीरमाता वीर पत्नी यांचा सन्मान या निमित्ताने करण्यात येणार आहे.
या कवी संमेलनाला महाराष्ट्रातील प्रख्यात कवी शशिकांत शिंदे, निलेश चव्हाण,शर्मिला गोसावी, अमोल चिनी, प्रशांत केंदळे, अविनाश भारती आदी कवींच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पाडणार आहे.
तरी या कवी संमेलनाचा देवळाली प्रवरा व पंचक्रोशीतील नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत