राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील राहुरी-मांजरी शिव हद्दी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा विवस्त्र अ...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील राहुरी-मांजरी शिव हद्दी दरम्यान एका उसाच्या शेतामध्ये ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुमन सावळेरराम विटनोर, राहणार मांजरी असे या मृत महिलेचे नाव असल्याची माहीती पोलीस सुञांकडून समजली आहे.
अधिक समजलेली माहीती अशी की, मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर, विलास विटनोर, भगवान विटनोर यांच्या मातोश्री रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या.,माञ त्या उशीरापर्यंत घरी न गेल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता आज दुपारच्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत हा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाच्या अंगावरील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने हे देखील ओरबडले असल्याचे असुन मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून चेहरा देखील जाळण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांकडून समजली आहे. दाग दागिने चोरण्यासाठी हि हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र चौकशीनंतर सत्य समजणार आहे.
घटनेची माहिती समजतात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अमित राठोड, दीपक फुंदे हे घटनास्थळी दाखल झाले असून अधिक माहिती घेत आहेत. घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञ अन् फॉरेन्सिक क्लबचे पथक घटनास्थळी दाखल होणार असल्याचे समजले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत