देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सरस्वती सेवाभावी ट्रस्ट, सिता ग्रुप व छत्रपती शासन ग्रुप यांच्या संयुक्त विद्य...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सरस्वती सेवाभावी ट्रस्ट, सिता ग्रुप व छत्रपती शासन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवनिमित्ताने शनिवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १ यावेळेत मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
देवळाली प्रवरा शहरातील शांताबाई कदम सांस्कृतिक भवन येथे पार पडणाऱ्या शिबिरात एचबी, शुगर लेव्हल, ईसीजी, रक्तदाब व आरोग्य तपासणी केली जाणार आहे. गणपती मंदिर भक्त परिवार व विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने पार पडणाऱ्या शिबिरात डॉ.संतोष गिते, डॉ.जितेंद्र ढवळे, डॉ.गणेश मिसाळ, डॉ.पंकज वर्पे,डॉ.रौनात जाधव, डॉ.रोहन धोत्रे, डॉ. भागवत वीर, डॉ.प्रीती वीर आदी डॉक्टर्स तपासणी करणार आहे.
आधिक माहितीसाठी ७०८३८०३५५०, ८६००८७४००५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत