संकल्पक'डून सर्वसामान्यांच्या व्यवसायाला चालना- माजी आ.कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संकल्पक'डून सर्वसामान्यांच्या व्यवसायाला चालना- माजी आ.कदम

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) संकल्प पतसंस्थेने सामान्य आणि आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील जनतेची समाजात पत निर्माण करून त्यांना व्यवसायात चालना देव...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



संकल्प पतसंस्थेने सामान्य आणि आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील जनतेची समाजात पत निर्माण करून त्यांना व्यवसायात चालना देवून रोजगार निर्मितीसाठी गेल्या वर्षभरात प्रामाणिपणे प्रयत्न केले असल्याचे प्रतिपादन शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांनी केले आहे.


राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील संकल्प नागरिक पतसंस्थेने द्वितीय वर्षात पदार्पण केले असून प्रथम वर्धापन दिन सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माजी आमदार चंद्रशेखर कदम बोलत होते. 

यावेळी संस्थेचे संस्थापक प्रा.सुधाकर कदम, मार्गदर्शक व तज्ञ संचालक अण्णासाहेब चोथे, व्हा.चेअरमन भालचंद्र थोरात आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना माजी आ.कदम म्हणाले की, सभासदांनी तसेच ग्राहकांची आर्थिक स्थिती संपन्न करण्याच्या दृष्टीने संकल्प पतसंस्था  समाजातील तळागाळातील आर्थिक दुर्बल घटकांना कर्जरूपी आर्थिक सहाय्य करून त्यांच्या विकासात गती देण्याचे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचे महत्वाचे कार्यकरीत आहे. तसेच ठेवीदारांना उत्तम सेवा देवून त्यांचा विश्वास संपादन केला असल्याचे कदम म्हणाले.प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा.सुधाकर कदम यांनी केले.


या कार्यक्रमास राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा परिसरातील पतसंस्था ,मल्टीस्टेट, मल्टिनिधी संस्थेचे चेअरमन , व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ व अधिकारी- कर्मचारी त्याचप्रमाणे देवळाली प्रवरा नगरपालिका आजी माजी नगरसेवक,राजकीय ,सामाजिक ,धार्मिक , उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच सामाजिक संघटना व राहुरी फॅक्टरी येथील माता-भगिनी यांनी उपस्थिती दर्शविली.


यावेळी सँस्थेचे संचालक डॉक्टर शौकत सय्यद , पारसमल खिंवसरा विठ्ठल शेटे , विजयकुमार खळेकर ,बबन डोंगरे ,भारत शेटे मुकुंद वेदपाठक, संदीप माने. सौ. सुजाता कदम, स्वाती काळे तसेच संस्थेचे अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते. आभार माजी नगरसेविका व संस्थेच्या संचालिका सुजाता कदम यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत