राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील युवा संघर्ष प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान श्री शक्तीचा सोहळा आनंदाचा याप्रमाणे होम मिनिस्टर खेळ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील युवा संघर्ष प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान श्री शक्तीचा सोहळा आनंदाचा याप्रमाणे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम आज गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वा. राहुरी फॅक्टरी येथील कारखाना कॉलनी व्हॉलीबॉल ग्राउंड शेजारी असलेल्या युवा संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केला असून यामध्ये आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आले आहे.
यामध्ये प्रथम बक्षीस सोन्याची नथ व पैठणी, द्वितीय बक्षीस चांदीचे जोडवे व सिल्क साडी, तिसरे बक्षीस चांदीचे नाणे आणि ड्रेस मटेरियल असे बक्षीसे असून यामध्ये परिसरातील महिला भगिनींनी सहभाग बनवावा असे आवाहन युवा संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत