राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाचे आज ९व्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुकीने विसर्जन करण्य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाचे आज ९व्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले.
राहुरी फॅक्टरी येथील माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गणरायाची स्थापना करण्यात येते त्यानिमित्ताने आज गणरायाची आरती चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड व शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या हस्ते संपन्न करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर लाडक्या गणरायाची डीजेच्या निनादात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित होते.
प्रसंगी दत्तात्रय म्हसे ,नितीन डमाळे,ओमकार कोबरने, महेश मोरे, गणेश डावखर,शनि आढाव, डॉ.योगेश पगारे,सागर भालेराव,अमोल गुंजाळ,कुणाल कोबरने, अभि राऊत, सार्थक ढेरे, त्रिलोकेश शेळके, गिरीश,समर्थ कोळसे आदींसह मित्रपरिवार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत