राहुरी फॅक्टरी(वेबटीम) धार्मिक कार्यात नेहमी स्वतःला वाहून घेणाऱ्या वरघुडे कुटुंबियाने नवीन व्यवसाया सुरू केला असून अगदी प्रामाणिकपणे व उत्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
धार्मिक कार्यात नेहमी स्वतःला वाहून घेणाऱ्या वरघुडे कुटुंबियाने नवीन व्यवसाया सुरू केला असून अगदी प्रामाणिकपणे व उत्तम सेवा देऊन ग्राहकांची सेवा करण्यावर ते निश्चित भर देतील असे प्रतिपादन देवगड येथील महंत प्रकाशनंदगिरी महाराज यांनी केले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील लक्ष्मी विहार कॉम्प्लेक्स येथे पूनम होलसेल साडी डेपोचा उद्घाटन समारंभ सोमवारी सकाळी महंत प्रकाशनंदगिरी महाराज बोलत होते. यावेळी वेदांत गुरुकुल आश्रमचे वेदांतचार्य संजय महाराज, विजय महाराज, भानुदास महाराज नवले, संजय महाराज शेटे, ऋषिकेश महाराज शेटे आदी संत मंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमास साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, लक्ष्मीविहार कॉम्प्लेक्सचे संचालक प्रमोद कदम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, हिंदू रक्षक धर्म परिषद राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता गागरे, साई विठ्ठल क्रेडिट सोसायटीचे संस्थापक किशोर रोहिदास कोबरणे, उद्योजक जयेश मुसमाडे, बुबळेश्वर ऍग्रोचे कार्यकारी संचालक जयसिंग घाडगे, कणगरचे पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे आदींनी उपस्थिती दर्शविली.
यावेळी श्रीराम घाडगे, अजिंक्य गायकवाड ,मनोज कदम, डॉ.सुनील कदम, इंद्रभान म्हसे, भगीरथ कोबरणे, श्रेयस वरघुडे, विजय वरघुडे, अमोल वरघूडे, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर आभार पूनम होलसेल साडीचे संचालक कुंडलीक वरघूडे यांनी मानले.
पूनम होलसेल साडी डेपो येथे सर्व नामांकित कंपनीच्या साड्या, पैठणी, शालू, घागरा तसेच लहान मुलींचे ड्रेस होलसेल दरात उपलब्ध असून खास नववधुंसाठी भरपूर व्हरायटीज लग्न बसत्यासाठी उत्तम सोय असल्याचे संचालक कुंडलिक वरघूडे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत