श्रीरामपूर शहरात प्रथमच गोल्ड होलमार्क सुविधा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर शहरात प्रथमच गोल्ड होलमार्क सुविधा

श्रीरामपूर(प्रतिनिधी) सोन्याचे दागिने हॉलमार्किंगसाठी सराफ व्यावसायिकांना अहमदनगर व संगमनेर येथे होणारी परवड आता थांबली असून श्रीरामपूर शहरा...

श्रीरामपूर(प्रतिनिधी)



सोन्याचे दागिने हॉलमार्किंगसाठी सराफ व्यावसायिकांना अहमदनगर व संगमनेर येथे होणारी परवड आता थांबली असून श्रीरामपूर शहरात ही सुविधा उपलब्ध झाली असून रविवारी श्रीरामपूर शहरात निर्भय ॲसे & हॉलमार्किंग सेंटरचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.



जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा. व आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, शिरसगाव तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पवार, हिंदूरक्षक धर्म परिषदेचे अध्यक्ष दत्ता गागरे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. 


 सोन्याचे दागिने हॉलमार्किंग करण्यासाठी या सेंटरची उभारणी करण्यात आली असून पूर्वी ही सुविधा केवळ अहमदनगर व संगमनेर येथे उपलब्ध होती. Bsi अंतर्गत अधिकृत निर्भय ॲसे  & हॉलमार्किंग सेंटर श्रीरामपूर शहरातील मेनरोडवरील लोढा संकुल येथे सुरू झाल्याने ग्राहक व व्यावसायिकांची सोने खरेदी करताना होणारी फसवणूक किंबहुना गैरसोय आता होणार नाही असे सेंटरचे दासू पठारे, विशाल गाडे, बाळासाहेब पोकळे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत