मिरी(प्रतिनिधी) मानवी जीवनात सध्या नवनवीन रोग शिरकाव करत आहे, आज आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे झाले आहे त्यासाठी सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीने ...
मिरी(प्रतिनिधी)
मानवी जीवनात सध्या नवनवीन रोग शिरकाव करत आहे, आज आरोग्य हे अतिशय महत्त्वाचे झाले आहे त्यासाठी सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीने सतर्क राहणे काळाची गरज झाली आहे सत्यजित कदम व त्यांच्या मित्रमंडळाने सर्वरोग आरोग्य शिबिर आयोजित करून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे असे प्रतिपादन ह.भ.प. भागवत महाराज वेताळ यांनी केले.
देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आयोजित, सत्यजित कदम पा.मित्र मंडळ व साईदिप हेल्थकेअर & रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्वरोग निदान शिबीरहनुमान मंदिर, बाजारतळ, मिरी येथे आयोजित करण्यात आले होते, यावेळी ह.भ.प. भागवत महाराज वेताळ बोलते होते पुढे बोलताना ते म्हणाले की, नागरिकांना आवश्यक व गरजेचे शिबिरे व उपक्रम राबविल्यास नक्कीच भगवंत आयोजकांना आशिर्वाद देतील असे ते म्हणाले, या प्रसंगी शिबिरास माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी भेट दिली, शिबिरास सहकार्य करणाऱ्या साईदीप हॉस्पिटल डॉक्टर्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. भागवत महाराज वेताळ, मिरी ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सुनंदाताई गवळी, वाघोली गावचे विद्यमान सरपंच उमेश जी भालसिंग, सोमनाथजी झाडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिनजी वायकर, ह. भ. प. डॉक्टर बबनराव नरसाळे ,विजयजी कुटे, अण्णा पाटील शिंदे , शुभम मोटे , रोहित वाबळे , सोमनाथ शिपणकर ,सागरजी मोटे ऋषिकेश जी गवळी ऋषीजी म्हस्के व सत्यजित पाटील कदम मित्र मंडळचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी जवळपास एक हजार रुग्णांनी या मोफत शिबिरात यामध्ये प्रामुख्याने जेष्ठ नागरिक व महिला भगिनी तपासणीचा लाभ घेतला व रुग्णांना यावेळी मोफत औषधे वितरित करण्यात आले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शुभम मोटे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत