आजपासून झाला आहे पितॄपक्ष सुरू पितॄपक्षातील नाटकांचे वर्णन तरी कसे करू जीवंत असताना मुले करतात आई बापाची वाटणी स्वतः रोज चांगलं गोडधोड खा...
आजपासून झाला आहे
पितॄपक्ष सुरू
पितॄपक्षातील नाटकांचे
वर्णन तरी कसे करू
जीवंत असताना मुले करतात
आई बापाची वाटणी
स्वतः रोज चांगलं गोडधोड खातात
आईबाप खातात मात्र मिरची चटणी
सणासुदीच्या दिवशीही नाही दिला
घासातला घास कधी
कधी मरतील म्हातारे असा
नवस करतात देवाला आधी
काही बहाद्दर तर त्यांना
वॄद्धाश्रमात नेऊन ठेवतात थेट
सुखदुःखाच्या वेळीही
नाही घेत कधी त्यांची प्रेमाने भेट
तेच सपुत पितॄपक्षात मात्र
नाटकं करतात खुप
कावळ्याला काव काव करून
विस्तवावर टाकतात गावरान तुप
जेवणासाठी करतात पुरी बासुंदी
गावरान तुपातील मोतीचूर लाडू
जेवणासाठी बोलावतात सारा गाव
सासू,सासरा,मेव्हणी आणि साडू
आता कसेही पक्वान्न करून
जेऊ घातले कितीही दादा आणि भाई
पण देवाघरून येणार नाहीत परत
हे पक्वान्न पाहायला बाप आणि आई
आईबाप जीवंत आहेत तोपर्यंत
तरी नका करू त्यांच्यावर भावनीक घाव
नाहीतर आपलीही मुले खेळतील
या जन्मीच आपल्यासंगेही हाच डाव
शब्दरचना ✍️
राजू ल.उदमले
मो-98903 54089
कोणत्याही टिप्पण्या नाहीत