वाढीव घरपट्टी व पाणीपट्टी विरोधात देवळाली प्रवरात सर्वपक्षीयांचे मुख्याधिकारी नवाळे यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वाढीव घरपट्टी व पाणीपट्टी विरोधात देवळाली प्रवरात सर्वपक्षीयांचे मुख्याधिकारी नवाळे यांना निवेदन

देवळाली प्रवरा(वेबटीम):- वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीच्या विरोधात देवळाली प्रवरा येथील महाविकास आघाडीसह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित य...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-

वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीच्या विरोधात देवळाली प्रवरा येथील महाविकास आघाडीसह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आज गुरुवारी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांना निवेदन दिले.


याबाबत मुख्याधिकारी नवाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, वाढीव दराने घरपट्टी तसेच पाणीपट्टी बिले देण्यास सुरवात केली आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात द्यावयाची हि देयके चार महिने उशिराने देण्यात आली आहेत. तसेच गेले आर्थिक वर्ष संपण्याअगोदर पुर्नमुल्यांकन करुन वाढीव बिले देणे अभिप्रेत असताना चक्क दीड वर्ष उशीराने हि बिले देण्यात आली आहेत.


नगरपरिषदेने घरपट्टीमध्ये सरसकट २०% टक्के वाढ दर्शवली आहे. तसेच गेल्या वर्षीचे २०% टक्के थकबाकी हि बिलात टाकुन जवळपास ४० टक्के रकमेची वाढीव बिले देण्यात आली आहेत. या वाढीव दरांचा शिक्षणकरासारख्या इतर उपकरांतहि वाढ केली गेली आहे. एकुण वाढ विचारात घेतली तर यावों जवळपास दीडपट सरासरी बिले नागरिकांना भरावी लागणार आहे. नगरपरिषदेत शिक्षणमंडळ अस्तित्वात नाही. नगरपरिषद कोणतीहि शैक्षणिक सुविधा देत नाही. मग हा शिक्षणकर वसुल करणे योग्य आहे का? रोजगार हमीची कामे नागरी भागात सुरु नसताना तो हि कर आकारणे संयुक्तीक नसल्याचे म्हंटले आहे.

 शेजारच्या राहुरी नगरपरिषदेने कोणतीही वाढ केलेली नाही. तसेच त्यांचे पाणीपट्टी दर रुपये १६५० असुन आपला रुपये १८०० आहे. दोन्ही नगरपरिषदेची भौगोलिक परिस्थिती एक असुन ती नगरपरिषद डिस्पॅच लिपिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तसेच शिक्षण तसेच आरोग्याच्या सुविधा पुरवते.  देवळाली प्रवरा मात्र  सुविधा पुरवत नाही. वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी  त्वरित मागे  न घेतल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.


यावेळी नानासाहेब कदम, वैभव गिरमे,  दत्तात्रय कडू, आप्पासाहेब ढुस, दीपक पठारे, कृष्णा मुसमाडे, कुणाल पाटील, वैभव गिरमे, भागवत मुंगसे, अनिल चव्हाण, कुमार भिंगारे, शंकर मुसमाडे, प्रभाकर कांबळे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत