राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त १ लाख वह्या वाटप करण्यात...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त १ लाख वह्या वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाचा नेवासा तालुक्यातील सुरेगाव रास्ता येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमात महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पेतून व पुणे स्थित उद्योजक व शांती चौक मित्र मंडळाचे संस्थापक विजयकुमार सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी १ लाख वह्या वाटप करण्यात येणार असून बुधवारी सुरेगाव रस्ता येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमात महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी दीपक त्रिभुवन, दत्ता साळुंके, डॉ.संदीप मुसमाडे, प्रकाश सोनी, रंगनाथ घाडगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महंत उद्धव महाराज मंडलीक म्हणाले, शांती चौकाने नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात अथक योगदान दिले असून शैक्षणिक क्षेत्रात १ लाख वह्या वाटपाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.
*महंत रामगिरी महाराजांच्या वही वाटप अभियानास शुभेच्छा*
शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी किशोर थोरात, प्रकाश सोनी आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत