देवळाली प्रवरा(वेबटीम) गेल्या चार वर्षात मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील 32 गावांमध्ये आपण जाणीवपूर्वक नियोजन करून कोट्यावधी रुपयांची विकास...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
गेल्या चार वर्षात मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील 32 गावांमध्ये आपण जाणीवपूर्वक नियोजन करून कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. जी कामे राहिली आहेत, त्याचे योग्य नियोजन करून ती पुढील काळात पूर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.
काँग्रेस बळकटीकरण व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. कानडे यांच्या जनसंवाद दौऱ्यात राहुरी तालुक्यातील मांजरी टाकळीमिया तसेच राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा या गावातील बुथ कमिटी सदस्य, ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. श्रीरामपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, उद्योजक अंकुश कानडे, अजय खिलारी, अमृत काका धुमाळ, माजी सभापती वेणूनाथ कोतकर, अनिल बिडे, नानासाहेब रेवाळे, शामराव निमसे, सुखदेव मुसमाडे, चांगदेव घोलप आदीसह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात विजेच्या वारंवार अडचणी येत असल्याने या परिसरात सबस्टेशन उभारण्याची मागणी शेतकरी व नागरिकांनी केली होती. त्यासाठी आपण तत्कालीन ऊर्जामंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या माध्यमातून वांजुळपोई येथे सबस्टेशन मंजूर केले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची विजेची अडचण दूर झाली आहे. गेली पाच वर्ष तालुक्यातील प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी आपण जाणीवपूर्वक नियोजन करून ही कामे दर्जेदार होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तालुक्यातील रस्ते, विज, पाणी, महीला व तरुणांच्या समस्या, बेरोजगारी याकडे लक्ष देवुन त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. यासह जलजीवन योजना, तलाठी कार्यालय, बस स्थानक, शाळांना एलएफडी, गावागावात व्यायाम साहित्य दिले. भविष्यात अजुनही पुष्कळ कामे करावायाची आहेत.
केंद्र व राज्य सरकारने सर्व वस्तूंना जीएसटी लावून महागाईचा आगडोंब भडकवला नोटबंदीचा निर्णय केला. त्याचा सर्वात जास्त त्रास गरीब माणसांना झाला. त्यात शेतकरी कष्टकरी मजूर भरडला गेला. राज्यातील सरकारला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत नाहीत. व्यापारी दुकानदारांचे दुःख माहीत नाहीत हे सरकार पूर्णपणे शेतकरीविरोधी सरकार असल्याचे टीका करून या गोष्टी जनतेला समजायला हव्यात, यासाठी हा संवाद दौरा असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मांजरीच्या सरपंच लता आंबेडकर, अण्णासाहेब विटनोर, अशोक विटनोर, कोंडीराम विटनोर, जालिंदर पिसे, रावसाहेब भगत, गोरख विटनोर, बाबू विटनोर, केशव बाचकर, धोंडीभाऊ बाचकर, नारायणराव टेकाळे, अनिल बिडकर, अण्णा पा. भगत, सोपान भगत, घोलप सर, अजय खिलारी, अशोक खुरुद, गोवर्धन शेटे, वसंत कदम, अरुण ढुस, अनिल चव्हाण, बबनराव कदम, दत्ता पा. कडू, सुधाकर कराळे, दत्तात्रय मुसमाडे, बबनराव मुसमाडे, दीपक पठारे, नंदू उल्हारे, गीताराम बर्डे, संजय वाळुंज, ललित चोरडिया, शरद काळे, संदीप पठारे, राहुल महांकाळ, संजय लाटे, दिनकर आढाव, नितीन वाळके, शरद संसारे, राकेश संसारे, विलास संसारे, अमोल मुसमाडे, अतुल थोरात, मदिना शेख, राजू गायकवाड, जुगल गोसावी, बाळासाहेब सगळगिळे, ज्ञानदेव चोथे, शंकर निमसे, संजय करपे, उत्तम निमसे, रावसाहेब निमसे, सुधाकर शिंदे आदींसह शेतकरी ग्रामस्थ तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत