राहुरी(प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे काल दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान श्रीरामपुर येथील गुंडांनी तलवारी...
राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे काल दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान श्रीरामपुर येथील गुंडांनी तलवारी, दांडे व हत्यारे घेवून घातपात घडवण्याच्या उद्देशाने उपद्रव केला. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेच्या निषेधार्थ आज देवळाली प्रवरा येथील नागरीकांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन सदर गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली.
पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा शहरातील विश्वकर्मा चौकामध्ये दोन कुटुंब वास्तव्यास आहेत. गुरुवार दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजता लहान मुलांच्या कारणावरुन दोन्ही परिवारामध्ये वाद झाला होता. त्यावेळी तेथील रहीवाश्यांनी सामंजस्याने तो वाद मिटवला. परंतु अचानक रात्री ११ वाजता ३५ ते ४० दुचाकी, एक टेम्पो भरुन जवळपास १०० गुंड हातामध्ये तलवार, धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड व इतर हत्यारे घेवुन विश्वकर्मा चौकात दाखल झाले.एका परिवारातील सर्व सदस्यांना मारहाण केली. तसेच मिटवायला समोर आलेल्या तरुणांना तलवारीचा व हत्यारांचा धाक दाखवला. हा प्रकार देवळाली प्रवरा शहराच्या शांततेला काळिमा फासणारा आहे. या प्रकारामुळे देवळाली प्रवरा शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे एका परिवारातील सदस्यांचे कॉल रेकॉर्ड तपासुन, झालेल्या कॉल्सची चौकशी करावी. आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज तपासुन आलेल्या गुंडांना ताब्यात घेवुन त्यांचेवर कडक कारवाई करावी. त्या परिवारातील सदस्यांवर ही कडक कारवाई करावी. देवळाली प्रवरा पोलीस चौकीत कायम स्वरुपी पोलीस उप निरिक्षकांची नेमणुक करावी. सदर मागण्यांचा तात्काळ विचार करावा व सर्व बाहेरुन आलेल्या गुंडांवर व सदर परिवारातील सदस्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा देवळाली प्रवरा शहर वासियांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला.
निवेदनावर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, शहाजी कदम, उत्तम मुसमाडे, संतोष चव्हाण, भागिरथ कदम, सचिन ढुस, सतिष वाळूंज, संतोष चोळके, दीपक राऊत, डॉ. संदीप मुसमाडे, सुनील सत्रे, कुमार कदम, शुभम राऊत, पवन कदम, पांडू कांबळे, शोएब शेख, प्रसन्न पंडित, महावीर गदिया, अंकुश राऊत, योगेश रहाणे, विजय कदम, अभिजीत कदम, बाळासाहेब गाढे, सुधीर टिक्कल, अजित चव्हाण, भीमराज मुसमाडे, अनंत कदम आदिंच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत