देवळाली प्रवरातील मूळ रहिवासी असलेला सहायक फौजदार लाचेच्या जाळ्यात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील मूळ रहिवासी असलेला सहायक फौजदार लाचेच्या जाळ्यात

संगमनेर(वेबटीम) तक्रारदाराच्या भावावर आश्वी पोलीस ठाण्यात  दाखल गुन्ह्यात तहसीलदारांसमोर हजर करण्याची कारवाई टाळण्यासाठी आणि गुन्ह्याची आपाप...

संगमनेर(वेबटीम)



तक्रारदाराच्या भावावर आश्वी पोलीस ठाण्यात  दाखल गुन्ह्यात तहसीलदारांसमोर हजर करण्याची कारवाई टाळण्यासाठी आणि गुन्ह्याची आपापसात तडजोड करण्यासाठी सहायक फौजदाराने दहा हजार रुपये लाचेची मागणी  केली होती. अखेर तडजोडीअंती नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सदर कारवाई अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. 21) केली असून आश्वी पोलिसांत सहायक फौजदार रवींद्र भानुदास भाग्यवान (वय 52, रा. इस्लामपुरा, देवळाली प्रवरा,ता. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या चुलत भावावर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यास तहसीलदारांसमोर हजर करण्याची कार्यवाही टाळण्यासाठी आणि दाखल गुन्ह्याची आपापसात तडजोड करण्यासाठी या पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार रवींद्र भाग्यवान याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.




मात्र, तडजोडीअंती नऊ हजार रुपयांची लाच  स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार चंदकांत काळे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, चालक पोहेकॉ. दशरथ लाड यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आश्वी पोलिसांत भाग्यवान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत