मुळाथडी परीसराचं विकासाचा महामेरू संजयजी जंगले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळाथडी परीसराचं विकासाचा महामेरू संजयजी जंगले

 नेवासा तालुक्यातील मुळा थडी परिसराचे भूषण संजयजी जंगले यांच्या कार्याचा अल्प परिचय वयाच्या 19व्या वर्षी पानेगाव तालुका नेवासे ग्रामपंचायतचे...

 नेवासा तालुक्यातील मुळा थडी परिसराचे भूषण संजयजी जंगले यांच्या कार्याचा अल्प परिचय



वयाच्या 19व्या वर्षी पानेगाव तालुका नेवासे ग्रामपंचायतचे सरपंच पद तसेच नंतर लोकनियुक्त सरपंच पद भूषविले, त्यांचा सरपंच पदाचा कार्यकाळात महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेवून शासनाने दखल घेवून पानेगांवला पुरस्कार देवून गौरविण्यात आले व स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम दूरदर्शन वृत्त वाहिनी प्रसारित करण्यात आला.पानेगांवची ओळख खऱ्या अर्थाने राज्य भरात संजय पाटील जंगले यांचा माध्यमातून झाली.तसेच इतर पद  भूसवली आजपर्यंत चाळीस वर्षापासून मुळा नदी मधील वाळू संवर्धन काम त्यामध्ये न्यायालयीन लढाई बरोबरच प्रशासनात बरोबर लोकशाही मार्गाने आंदोलने आजपर्यंत पानेगाव मांजरी वाळू लिलाव झालेला नाही याबद्दल आदर्श गाव बाजार सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते दैनिक लोकमत समूहाकडून वाळू जतन अनमोल ठेवा या पुरस्काराने जंगले यांना गौरवण्यात आले. मुळा सहकारी साखर कारखाना 35 वर्षापासून संचालक पद आजपर्यंत भूषवित आहे मुळाधरणातुन 18 गाव सोनई सह करंजगाव   प्रादेशिक पाणी योजनेचे पाच वर्षापासून अध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळून शेवटच्या घटकापर्यंत योग्य पाण्याचे नियोजन करत असल्याने जनतेला स्वच्छ व निर्मळ पाणी पिण्यासाठी मिळत आहे या निमित्ताने विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सन 2019 साली पानेगाव ग्रामपंचायत निवडणूक लोकनियुक्त सरपंच पदी मोठ्या मताधिक्याने विजय होऊन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख पाटील, तत्कालीन बांधकाम समितीचे सभापती सुनील भाऊ गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा सुसज्ज ग्राम सचिवलय त्याचबरोबर गावांमध्ये कॉंक्रिट रस्ते अद्यावत स्मशानभूमी असंख्य झाडाने बहरलेली वृक्ष अंडरग्राउंड गटार, गोरगरिबांसाठी घरकुल योजना प्रभावी अंमलबजावणी केल्याने गाव छप्पर मुक्त झाले अंगणवाडी डिजिटल त्यामुळे जिल्ह्यात नवी ओळख निर्माण झाली पानेगाव हे त्यांनी स्वतःच्या संकल्पना साकारलेले प्रशासकीय यंत्रणेची भेट म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी संजय शेवाळे साहेब यांच्या शासकीय भेटीने गावाचा कौतुक करून जंगले यांचा सन्मान करण्यात आला गावातील असणारे मंदिर पूर्ण जिर्णोद्धार करून दरवर्षी सामाजिक धार्मिक कार्यक्रमात  कीर्तनाचा दरवर्षी पारायण सोहळ्यात आयोजन करण्यात येत असतं ते स्वतः थांबवून लक्ष घालून साफसफाई पासून ते नियोजन जंगले  करत असतात. 2023 साली राज्य स्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार गौरविण्यात आले. जेष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील नामदार शंकरराव गडाख पाटील  माजी सभापती सुनील भाऊ गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगीण विकास त्यांनी केला असल्याने गावाला भेटी देण्यासाठी जिल्हाभरातून ग्रामस्थ येत असतात त्याचबरोबर शाळेच्या गाव बघण्यासाठी सहली येतात हे सर्व त्यांच्या अथक परिश्रमातून घडले आजही ते गावच्या परिसराच्या सुखदुःखात सहभागी असून स्वतः शेतातही राबतात अशी संजय पोपटराव जंगले  पाटील यांनी गावाला परिसराला ते आपलं स्वतःच्या कुटुंब मानतात त्याचबरोबर त्यांनी आपल्या संकल्पनेतून दहावी व बारावी तसेच परिसरातील गावातील दरवर्षी यशसंपादन   विद्यार्थीचा सन्मान करत असतात.असाच सर्व धार्मिक सामाजिक राजकीय कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. 

संत भगवान बाबा संस्थेच्या वतीने दिला जाणा आदर्शवत राज्यस्तरीय लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले यांना नुकताच प्रदान करण्यात आला

तुमच्या पुरस्काराने मुळाथडी परीसरा बरोबरच पानेगांव करांना अभिमान वाटतो त्रिवार अभिनंदन

आदरणीय अणांना भावी कार्याला शुभेच्छा


शब्दांकन-

बाळासाहेब नवगिरे पाटील

 नामदार शंकरराव गडाख पाटील युवा मंच अहिल्यानगर जिल्हा

लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील मित्र मंडळ

 बाळासाहेब नवगिरे पाटील ,जिल्हाप्रमुख महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना अहिल्यानगर जिल्हा 

उदयन डेव्हलपर्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत