देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त १ लाख वह्या वाटप उपक्रम ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांच्या वाढदिवसानिमित्त १ लाख वह्या वाटप उपक्रम सध्या सुरू असून आज राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आ.कदम म्हणाले की, १ लाख वह्या वाटपाचा दीपक त्रिभुवन यांच्या माध्यमातून राबविला जाणार उपक्रम हा प्रेरणादायी आहे. त्यांच्या मनोकामना पूर्ण होवो अशा शुभेच्छा माजी आ. कदम यांनी दिल्या आहेत.
यावेळी दीपक त्रिभुवन, उद्योजक ऋषभ लोढा, अनंत कदम, शैलेंद्र कदम, मच्छीन कदम, डॉ.संदीप मुसमाडे, वैभव गिरमे, संदीप कदम, जयेश मुसमाडे, प्रकाश सोनी, हर्षद ताथेड, नितीन डंबाळे, महेश देसरडा, दत्तात्रय साळुंके, अतुल त्रिभुवन, विजय सोनवणे, अजित येवले, अभि आहेर, प्रणय भोसले, साई त्रिभुवन प्राचार्य श्री.कडूस आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत