मुळाथडी परिसरातील मुळामाईच्या कुशित पानेगाव- मांजरीच्या चंद्रागिरीच्या पावनभुमित खऱ्या अर्थान समाजकारणातून समाजसेवी नेतृत्व तयार झाले, ते म्...
मुळाथडी परिसरातील मुळामाईच्या कुशित पानेगाव- मांजरीच्या चंद्रागिरीच्या पावनभुमित खऱ्या अर्थान समाजकारणातून समाजसेवी नेतृत्व तयार झाले, ते म्हणजे उद्योजक दत्तात्रय (अण्णा) पाटील घोलप. पानेगावच्या विकासात भूमिपुत्रांचे असलेले योगदान पाहता त्यात आण्णांचे नाव आवर्जून घ्यावे लागते.
आपण कमविलेल्या पैशातून काही पैसा समाजासाठी तसेच सामाजिक चळवळीसाठी वापर केल्यास संपत्तीबरोबर संस्काराला जोड मिळवून ते कार्य फलित होते, असे आण्णांचा विचार आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अशी अनेक कामे केली. परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची सुरुवात वाटापूर, ता. नेवासा येथे असणारे अशुद्ध पाणी तसेच अपुरा असणारा जलसाठा पाहून आपल्या गावामध्ये स्वःखर्चाने व स्वतःच्या टँकरमधून गोड पाण्याचा पुरवठा सुरू केला. या कामातून शासनाला मदत होते म्हणून अहमदनगरचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात करुन त्यांचा गौरव केल्यामुळे एक प्रकारचे त्यांना नवचैतन्य मिळाले
*मुळाथडी परिसरातील गावांची गरज ओळखून घोलप पाटलांनी पानेगाव, ता. नेवासा येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आणली. स्वतःच्या जागेमध्ये व भव्य वास्तुमध्ये भारतीय स्टेट बँकेची शाखा दिमाखदारपणे चालू केली आहे. आपले काम न थांबवता मंदिरे, शाळा, कॉलेज देणग्यांच्या स्वरुपात तसेच शाळांना कॉम्प्युटर, वह्या, पुस्तके देतानाच गरजुवतांना कपडे, घर बांधून दिली*
*मुळा थडी परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न त्यांनी बघून नदीवरील असणारे बंधाऱ्यावर विचार मंथन करुन परिसरातील युवकांना बरोबर घेवून मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीची स्थापना केली. बंधारे भरण्यासाठी तसेच १० टक्के पाणी आरक्षण साठ्यासाठी वेळोवेळी नदी पात्रात उपोषणे, आंदोलने केली, तसेच मंत्रालयात मंत्री महोदयांना भेटून परिसरातील पाणीप्रश्नासाठी भेटी घेवून घेतली. १० टक्के पाण्यासाठी, बंधारे भरुन त्यासाठी त्यांची टीम कार्यान्वित आहे. त्यांचा जिल्हाभरातून अनेक पुरस्काराने सन्मान झाला.खऱ्याअर्थाने हा परिसराचा अभिमान समजला जातो आहे.
जेष्ठ नेते मा.खा.यशवंतराव गडाख पाटील,यांचा विचाराने प्रेरित होऊन नामदार शंकरराव गडाख पाटील, लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांचा मार्गदर्शनाखाली राजकिय क्षेत्र कसा पद्धतीने समाजसेवा करु शकतो हे त्यांनी पानेगांवच्या ग्रामपंचायत उपसरपंच पदावर कार्यरत होवून दाखवून देत आहे. ज्ञानज्योती संस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श उपसरपंच पुरस्कार देवून गौरविण्यात आले या पुरस्काराने आणखी जबाबदारी हि उपसरपंच घोलप यांची वाढली असून निश्चितच मुळाथडी परीसराला तसेच पानेगांव करांना अभिमान आहे
आदरणीय अण्णांना भावी कार्याला शुभेच्छा
शब्दांकन
बाळासाहेब नवगिरे पाटील
नामदार शंकरराव गडाख पाटील युवा मंच अहिल्यानगर जिल्हा, लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील मित्र मंडळ
जिल्हाप्रमुख महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना अहिल्यानगर जिल्हा
उदयन डेव्हलपर्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत