राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील आदर्श नागरी पतसंस्थेने जिल्ह्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे या संस्थेचा आलेख नेहमी उंचावत असून सं...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील आदर्श नागरी पतसंस्थेने जिल्ह्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे या संस्थेचा आलेख नेहमी उंचावत असून संस्थेने यावर्षी ७२ कोटी रुपयांच्या ठेवीचा पल्ला पार केला असून सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर केला असल्याचे संस्थेचे चेअरमन प्रा. सुधाकर कदम यांनी सांगितले आहे.
याबाबत माहिती अशी की,जिल्ह्यामध्ये आर्थिक दृष्ट्या नावलौकिक असलेल्या व राहुरी फॅक्टरी मुख्य शाखा असलेल्या आदर्श नागरि पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे सभेपुढे मांडण्यात आलेले सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी संस्थेच्या सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सुधाकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभेपुढील विविध विषय चेअरमन सुधाकर कदम ,मार्गदर्शक संचालक आण्णासाहेब चोथे, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, संचालक शिवाजीराव कपाळे ,भारत चोथे, दत्तात्रय रोडे, मारुती खरात ,प्रकाश सोनी रामचंद्र काळे आदींनी मांडले.सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चेअरमन सुधाकर कदम यांनी सांगितले की, येत्या आर्थिक वर्षामध्ये संस्था 100 कोटींच्या ठेवींचा पल्ला पार करणार आहे पारदर्शक कारभार सभासदांचा विश्वास ठेवीदारांचा विश्वास त्याचबरोबर कर्मचारी यांनी दिलेली साथ या जोरावर संस्था भरभराट करीत आहे. सभासद कामगार ठेविदार या सर्वांचे हित आम्ही नेहमी जोपासले आहे तो विश्वास येथून पुढेही असाच राहील असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
अहवाल वाचन मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले तर सभेच्या यशस्वीतेसाठी शाखाधिकारी संभाजी सौदागर , दत्तात्रय मोरे, किशोर पवार ,संभाजी हारगुडे आदींसह कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत