श्रीरामपूर(वेबटीम) रात्रीच्या वेळी श्रीरामपूर ते राहुरी फॅक्टरी रोडवर प्रवास करणे आता धोक्याचे बनले आहे. नरसाळीजवळ मिरची पूड टाकून एका तर...
श्रीरामपूर(वेबटीम)
रात्रीच्या वेळी श्रीरामपूर ते राहुरी फॅक्टरी रोडवर प्रवास करणे आता धोक्याचे बनले आहे. नरसाळीजवळ मिरची पूड टाकून एका तरुणाला रात्रीच्या वेळी लुटण्याची घटना घडल्याने घबराट पसरली आहे.
राहुरी तालुक्यातील करजगाव येथील शुभम कोतकर हा देवळालीवरुन करजगावकडे जात असताना रात्रीच्या सुमारास त्याला नरसाळी जवळील करजगाव शिवरस्त्यावर एका विना नंबरच्या बुलेटवर आलेल्या चौघांनी पकडले व शुभम याला मारहाण करून त्याच्या डोळ्यात मिरचीची भुकटी टाकून शुभमकडे असलेले ०५ हजार रुपये व मोबाईल काढून घेतला. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या शुभमने नरसाळी जवळील राजळे वस्तीकडे पळ काढला.
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींचा शोध सुरू आहे. रात्रीच्या वेळी राहुरी फॅक्टरी ते श्रीरामपूर रस्त्यावरून अनेक जण प्रवास करत असतात मात्र अशा घटना घडू लागल्याने प्रवासी वर्गाने काळजी घेणे गरजेचे आहे. रात्री आधी बिबट्याची भीती त्यात आता लुटारूंचा धाक प्रवासी वर्गाला पडला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत