बाभळेश्वर(प्रतिनिधी ) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत पारंपारिक शिल्पकार आणि कामकारांना सहायला मिळावी यासाठी केंद्रीय योजने अंतर्गत ...
बाभळेश्वर(प्रतिनिधी)
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत पारंपारिक शिल्पकार आणि कामकारांना सहायला मिळावी यासाठी केंद्रीय योजने अंतर्गत 18 पारंपारिक व्यवसायांपैकी, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, बाभळेश्वर (शिर्डी) येथे बारबर(न्हावी)अशा ८५ व्यावसायीकांना( लाभार्थ्यांना )यशस्वी रित्या सात दिवसाचे प्रशिक्षण देऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २८ सप्टेंबर रोजी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
प्रसंगी प्रधानमनी वैशिला कौशल्य केंद्राचे प्रमुख तथा प्रोजेक्ट मॅनेजर सुशील देसरडा , हिलेश किकाणी, योगेश दिमन सर, व केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी लाभार्थ्यांना योजनेचे फायदे, लाभ व ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करून दिले. जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत