राहुरी फॅक्टरी (सागर भालेराव) राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालयातील गणपती बाप्पाचे आज ५व्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुकीने ...
राहुरी फॅक्टरी (सागर भालेराव)
राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालयातील गणपती बाप्पाचे आज ५व्या दिवशी भव्य दिव्य मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले.
राहुल फॅक्टरी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात दरवर्षी गणरायाची स्थापना केली जाते. त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आज सकाळी गणपती बाप्पाची आरती करून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी बीएमएस, फार्मसी व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी तसेच प्रा.विलास कड, श्री.पागिरे सर, बांगर सर, गागरे सर , जाधव सर, शिरस्कर सर, धोंडे सर, वराळे सर, म्हसे सर व प्राध्यापक मंडळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी भेट दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत