राहुरी फॅक्टरी(सागर भालेराव) राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्ग लगत असलेल्या ग्राहक भांडार स्टेट बँकेसमोर सप्तशृंगी माता मंदिर येथे आज १८ ...
राहुरी फॅक्टरी(सागर भालेराव)
राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्ग लगत असलेल्या ग्राहक भांडार स्टेट बँकेसमोर सप्तशृंगी माता मंदिर येथे आज १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाचे आयोजन आले आहे.
२०३४ चा शारदीय नवरात्र उत्सव अत्यंत आनंदात पार पडला आहे. सालाबाद प्रमाणे नवरात्र उत्सवाची सांगता भंडारा ( महाप्रसाद ) करण्यात येणार आहे. महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष भारत मुसमाडे, उपाध्यक्ष अरुण कोळसे, सचिव बालू (सचिन )कोबरणे,भरत गोंधळे, खजिनदार विजय भिसे, भारत गिते, भारत खांदे, कार्याध्यक्ष बाळासाहेब तारडे , सुनील जाधव, सिद्धार्थ साळुंके यासह कार्यकर्त्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत