देवळाली प्रवर/वेबटीम:- देवळाली प्रवरातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळुंज यांनी शहरातील सामाजिक संघटना एकत्र करून शहरातील विश्वकर्म...
देवळाली प्रवर/वेबटीम:-
देवळाली प्रवरातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळुंज यांनी शहरातील सामाजिक संघटना एकत्र करून शहरातील विश्वकर्मा चौकामध्ये भव्य दिव्य अशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली.
शहरातील श्रीराम प्रतिष्ठान, स्व.राहुल वाळुंज मित्र मंडळ, विश्वकर्मा प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा व्यापारी असोसिएशन या संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन कोजागिरी पौर्णिमेचा आनंद लुटला. प्रारंभी सर्व सदस्यांना अल्पोपहार देऊन स्वादिष्ट दुधाचे वाटप करण्यात आले. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश वाळुंज यांनी सांगितले की समाजाच्या सर्व थरातील नागरिकांमधे जातीभेद दूर होऊन एकोपा नांदावा हा उद्देश ठेवून आपण दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असतो. यावेळी प्रामुख्याने वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, हेमंत चोरडिया,जालिंदर मुसमाडे गणेश विघे, संतोष मुथ्था, प्रमोद शिंगी, विजय कदम, महाविर गदिया, गौतम कटारिया, जयेश चोरडिया , हेमंत आंबिलवादे,सनी मुथ्था आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत