लैगिक अत्याचार की हिंसाचार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लैगिक अत्याचार की हिंसाचार

 आपण आजपर्यंत ऐकलं होतं की मुली ह्याच फक्त लैंगिक अत्याचाराला बळी पडतात पण कालच्या श्रीरामपूर येथे  घडलेल्या घटनेने मन हेलकावून टाकले आहे. ख...

 आपण आजपर्यंत ऐकलं होतं की मुली ह्याच फक्त लैंगिक अत्याचाराला बळी पडतात पण कालच्या श्रीरामपूर येथे  घडलेल्या घटनेने मन हेलकावून टाकले आहे. खरतर माझ्या मनात विचारांचा लपंडाव चालू झाला. येणारी तरुण पिढी ही कोणत्या दिशेने चालली आहे?


 


मुली तर सुरक्षित नाहीच पण आता मुलं पण सुरक्षित नाहीत का?  ह्या घटनेवर पालकांचे प्रश्न उपस्थित झाले आहे आणि ते साहजिकच आहे. परवा अकरा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाला आणि आश्चर्य म्हणजे तो धार्मिक उत्सव दरम्यान केलेले कृत्य आहे.

समलिंगी आकर्षण झालं तरी कसं ? आश्चर्य म्हणजे अल्पवयीन मुलासोबत हे घृणास्पद  कृत्य करणारे  सुद्धा अल्पवयीनच!!! यात चूक कुणाची? आई-वडिलांची का मोबाईलची??

  

आजकालची मुलं मोबाईलवरती वाटेल ते बघतात आणि त्यांतून त्यांना शारीरिक आकर्षण वाटू लागतं.  त्यांना लैंगिक शिक्षण न दिल्याने ते  अत्याचार करतात आणि  POSCO (Protection of Children from Sexual Offences Act)  सारखा कायद्याने त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. त्याचं सगळ आयुष्य हे विस्कळीत होतो. क्षणिक सुखासाठी ते नितीभ्रष्ट होतो पण त्याचा परिणाम  फक्त त्याच्या कुटुंबीयांनाच नाहीतर तर पूर्ण समाजाला भोगावा लागतो. 

ज्या वयात त्यांना आकाशाला आलिंगन देयाच असत त्या वयात ते असे गुन्हे करुन  कुठतरी फरफटत असतात.शारीरिक संघर्षापेक्षा वैचारिक संघर्ष महत्त्वाचा असतो.

 सेक्स विषयी खुलेपणाने बोलले जात नाही किंवा विचारल जात नाही. तो सभ्यपणा नाही किंवा तो मुलगा किंवा मुलगी वाया गेलेले आहे,  असं समजलं जातं. लैंगिक अत्याचार हा हिंसाचाराचा प्रकार आहे.या घटनेला आपण समलिंगी संबंध म्हणू शकतच नाही कारण  हे फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठी केलेला अनैसर्गिक अत्याचार आहे.आज कालच्या पिढीला लैंगिक शिक्षण देणं खूप महत्त्वाचं झालं आहे....


 मनिषा रंजना बाळासाहेब लांबे 

राहुरी ,अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत