राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौक परिसरातील नागरिकांना काल शनिवारी सायकांळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांत...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौक परिसरातील नागरिकांना काल शनिवारी सायकांळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांत घबराट पसरली आहे.
वैष्णवी चौक येथील पेपरमिल कडे जाणाऱ्या रस्त्यालगत मोकळ्या काटवणात हा बिबट्या दिसून आला आहे. अनेक नागरिकांनी हा बिबट्या बघितला आहे. बिबट्याच्या दर्शनाने या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. वाड्या वस्त्यांवरील बिबट्याने शहरी भागात एन्ट्री करू लागल्याने वनविभागाने तातडीने लक्ष घालून वैष्णवी चौक परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वसंत कदम यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत