श्रीरामपूर/वेबटीम:- काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अत्यंत प्रामाणिकपणे पक्ष नेतृत्वाशी व पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलो. मायबाप मतदार...
श्रीरामपूर/वेबटीम:-
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अत्यंत प्रामाणिकपणे पक्ष नेतृत्वाशी व पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलो. मायबाप मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची दिलेली संधी जबाबदारी समजून भेदभाव न करता सर्वांची कामे केली.
कोरोनासारख्या महामारीमध्ये दोन वर्ष वायाला जाऊनही आमदारकीच्या कार्यकाळात मागील २० वर्षात झाली नाही एवढी विकास कामे केली. याचा जमाखर्चही मायबाप जनतेसमोर लेखी स्वरूपात कार्य अहवाल प्रसिद्ध करून सादर केला.
घराणेशाहीच्या ताब्यातून पक्ष संघटना मुक्त करून तळागाळापर्यंत उत्तम संघटना बांधली. जनतेमध्ये आमदार लहू कानडे यांनाच पुन्हा संधी देण्याची भावना असताना पक्षाच्या दिल्लीस्थित नेत्यांनी एका पक्षनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्याचा विश्वासघात केला. ही अत्यंत वेदना देणारी बाब आहे.
महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आचार्य अत्रेनंतर जनतेमधून निवडून गेलेला मी एकमेव सदस्य ठरलो. विधानमंडळात मागील २० वर्ष बंद पडलेला श्रीरामपूरचा आवाज जनतेचे प्रश्न मांडून पुन्हा बुलंद केला. त्यामुळे पुन्हा मायबाप मतदारांच्या न्यायालयात माझ्यावर पक्षाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात सोमवार दि. 28 रोजी उमेदवारी अर्ज भरून न्याय मागणार आहे.
मायबाप जनतेला त्यांचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे की, पुन्हा एखाद्या घराण्याचा घरगडी निवडून द्यायचा आहे, याचा फैसला मायबाप जनताच करेल, याची मला खात्री आहे. पक्षाने केलेल्या अन्यायाविरुद्ध जनताच न्याय करेल, अशी प्रतिक्रिया आमदार लहू कानडे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत