राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आमदार लहू कानडे यांनी काँग्रेसला स...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आमदार लहू कानडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान कानडे हे अजित पवार गटाकडून उमेदवारी करून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात युतीकडून उमेदवारी करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे उद्या मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कानडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
कानडे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी अंतिम मानली जात असल्याने श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले महायुतीतील शिंदे गट व भाजपच्या इच्छुकांना मोठा धक्का बसणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत