देवळाली प्रवरा(वेबटीम) दिवाळी दरम्यान घरगुती स्वच्छता करताना अनेकजण कपडे, पुस्तके जाळतात किंवा फेकून देतात, मात्र त्या वस्तू जर चांगल्या असत...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
दिवाळी दरम्यान घरगुती स्वच्छता करताना अनेकजण कपडे, पुस्तके जाळतात किंवा फेकून देतात, मात्र त्या वस्तू जर चांगल्या असतील तर त्या इतर गरजूंना पोहचवून यंदाच्या दिवाळीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविन्याच्या अनुषगांने देवळाली प्रवरा नगरपरिषद मुख्याधिकारी विकास नवाळे यांचा संकल्पनेतून “एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा” हा उपक्रम राबवणार आहे अशी माहिती आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ यांनी दिली.
सदर उपक्रमाकरिता नगरपरिषदेमार्फत ‘गरजूवतांना मदत रथ तयार करणेत येणार आहे. हा रथ संपूर्ण शहरहद्दीत फिरणार आहे.त्यामुळे दिवाळीत स्वच्छता करताना निघणा-या अनावश्यक वस्तू, इतर साहित्य, वाढत्या वयामुळे न येणारे कपडे,चप्पल,शूज फेकून न देता किवां अन्य प्रकारे विल्हेवाट न लावता गरजूंपर्यंत पोहचले तर त्यांना आधार मिळू शकतो याहेतूने. दिनांक २८/१०/२०२४ ते ३०/१०/२०२४ याकालावधीत हा उपक्रम हाती घेणार आहे.
तरी सर्व शहरवासीयांनी मदतीचा एक हात पुढे करून सदर अभियानात सहभागी व्हावे. असे आवहान मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत