राहुरी फॅक्टरी(वेबटीम) शाळेत चाललेल्या शाळकरी मुलींच्या पाठीमागे अर्धनग्न अवस्थेत फिरून त्यांचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राह...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
शाळेत चाललेल्या शाळकरी मुलींच्या पाठीमागे अर्धनग्न अवस्थेत फिरून त्यांचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात सोमवारी सकाळी घडली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात २२ वर्षीय तरुणा विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर पीडित शाळकरी मुलीच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली असून दोन शाळकरी मुली या सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत चालल्या असता सोहेल अहमद सय्यद यांनी अर्धनग्न अवस्थेत त्यांचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सोहेल सय्यद याचे विरुद्ध पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत