सोनई प्रतिनिधी नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील शिरेगांव येथील सोपानराव जाधव,बंकटराव जाधव, शंकरराव जाधव, काकासाहेब जाधव यमासाहेब जाधव,...
सोनई प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील मुळाथडी परीसरातील शिरेगांव येथील सोपानराव जाधव,बंकटराव जाधव, शंकरराव जाधव, काकासाहेब जाधव यमासाहेब जाधव, गोविंद जाधव वरील आदींचा लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांच्या उपस्थितीत माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख गटात प्रवेश करण्यात आला यावेळी शिरेगांवचे लोकनियुक्त सरपंच निरंजन तुवर जेष्ठ नेते दिगंबर जाधव विठाई संस्थेचे अध्यक्ष परमानंद जाधव हरीभाऊ पवार उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्ते सोपानराव जाधव यांनी सांगितले कि, लोकनेते सुनिलभाऊ तसेच आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील तसेच मुळाथडी परीसरातील विकास कामाबरोबरच सुखदुःखात वेळोवेळी जनतेबरोबर असून आज आम्ही आमदार गडाख यांचा बरोबर काम करुन जास्तीत जास्त मताधिक्य आमच्या शिरेगांव तसेच मित्र परिवार गडाख कुटुंबातील घटक म्हणून काम करणार असल्याचे सांगितले.
लोकनेते सुनिलभाऊ गडाख यांनी म्हटले की,शिरेगांव येथील लहान थोरांपासून जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना मानणारा वर्ग असून उद्याचा निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख यांना मताच्या रुपाने शिरेगांवकरांचं आशिर्वाद रुपी प्रेम या अगोदर हि मिळाले आणि उद्या हि मिळणार असल्याचं गडाख यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत