श्रीरामपुर/वेबटीम:- राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यात सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्याचदरम्या, राजकीय ...
श्रीरामपुर/वेबटीम:-
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यात सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्याचदरम्या, राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे गाडीवर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकासमोर आला आहे. या घटनेनं नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर हा सगळा प्रकार घडला आहे.
मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर ५ गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने भाऊसाहेब कांबळे सुदैवाने बचावले आहेत. रात्री दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात आरोपींविरोधात श्रीरामपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
भाऊसाहेब कांबळे यांनी घटनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "अशोक साखर कारखान्याच्या गेटसमोर अज्ञात व्यक्तींनी माझ्या गाडीवर गोळीबार केला. मी पोलीस स्टेशनला केस नोंदवायला आलोय. या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी उमेदवार उभा आहे. अशा पद्धतीने या शहरामध्ये घडत गेलं. असंच घडत गेलं तर हे खूप कठीण आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे. पोलिसांकडे माझी मागणी आहे की, माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास झाला पाहिजे. हा काही अज्ञातांनी केला आहे. हल्ला का केला? हे मला माहिती नाही. पण मतदारसंघात माझं वर्चस्व आहे आणि ते बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे''.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत