पानेगांव (वार्ताहर) राजकारणात समाजसेवी कार्याबरोबरचं राजयोग तितकाच महत्त्वाचा असल्याचे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके (पानेगांव ता. ...
पानेगांव (वार्ताहर)
राजकारणात समाजसेवी कार्याबरोबरचं राजयोग तितकाच महत्त्वाचा असल्याचे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके (पानेगांव ता. नेवासे) येथील स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान केलेल्या नवसपुर्ती निमित्ताने दर्शनासाठी खासदार लंके आले होते त्यावेळी ते बोलत होते.
हूल झपाटी खोट्या बाता हे सोशलमीडियाच्या जमान्यात चालतं नसून शेवटच्या घटकांपर्यंत सुखदुःखात गेल्या शिवाय पर्याय नाही. सार्वजनिक विकासाबरोबरच वयक्तिक लाभ हि मतदार संघात वीस वर्षे पासून सुरु असल्याने जनतेने मतपेटीतून आशिर्वाद दिले. अगोदर पारनेरचा आमदार आणि आता नगर दक्षिणचा खासदार हि समाजसेवेची पावती आहे. कोरोना काळात राज्याला दिशादर्शक ठरणारा कोवीड सेंटर उघडून रात्रंदिवस सहकाऱ्यांना बरोबर घेवून सेवा केली.ते आशिर्वाद कामं आले. यावेळी खासदार लंके यांनी दिवसाचा दिनक्रम सांगितला राज्यातला मोठा मतदार संघ म्हणून नगर दक्षिणेची ओळख आहे.शेवटच्या टोकापर्यंत मी तसेच कुटुंबातील चार सदस्य नेहमी सुखदुःखात भेटी सुरु असतात दररोज रात्री आडीचं ते तीन जेवणासाठी वेळ होत असतो.
शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना लंके यांनी सांगितले कि, भाजप महायुती सरकारने शेतकऱ्यांन बरोबरच कोलमडलेला दूध धंदा, बेरोजगारी, जाती पातीत लावलेले वाद गुजरात राज्यात गेलेले आपले उद्योग याला जबाबदार भाजप महायुती जबाबदार आहे. परंतु काळजी करु नका उद्या आपलं महाविकास आघाडीचं सरकार येणार असून शेतकऱ्यांना तसेच युवकांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.
स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान वतीने सेवेकरी रमेश अण्णा जंगले अमित जंगले यांनी देवस्थान माहिती देवून खासदार लंके यांच्या हस्ते आरती करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी पानेगांवचे लोकनियुक्त मा.सरपंच संजय जंगले उपसरपंच दत्तात्रय पाटील घोलप, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले, संकेत जंगले,दिपक जंगले,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जंगले, आमराई उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरज जंगले, विशाल जंगले, मांजरी संस्थेचे मा अध्यक्ष आण्णासाहेब विटनोर कोंडीराम विटनोर भाऊसाहेब विटनोर मांजरी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय विटनोर आण्णासाहेब बिडे, राजेंद्र महानोर, भय्यासाहेब विटनोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेवासे तालुकाध्यक्ष योगेश पवार, सचिन विटनोर बाळासाहेब आढाव, नितीन आढाव, निलेश लंके प्रतिष्ठान राहुरी तालुकाध्यक्ष प्रमोद विटनोर गणेश घावटे नंदकुमार वारुळे, प्रविण वारुळे, प्रदिप टेमक,नितीन टेमक, सुर्यकांत टेमक सुरेश आढाव शिवाजी आढाव जालिंदर जंगले दिनेश जंगले साई चिंधे, चाचा जंगले, लक्ष्मण गागरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत