देवळालीत एक हात मदतीचा उपक्रम मुख्याधिकारी नवाळे यांची संकल्पना ऊस तोडणी कामगार व गरजूवंतांना साहित्य वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळालीत एक हात मदतीचा उपक्रम मुख्याधिकारी नवाळे यांची संकल्पना ऊस तोडणी कामगार व गरजूवंतांना साहित्य वाटप

  देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद मुख्याधिकारी श्री विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून साकार केला एक अनोखा उपक्रम, एक हात मदतीच...

 देवळाली प्रवरा/वेबटीम:-


देवळाली प्रवरा नगरपरिषद मुख्याधिकारी श्री विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून साकार केला एक अनोखा उपक्रम, एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा " याद्वारे शहरातील नागरिकाना आवाहन करणेत येऊन त्याच्याकडून वापरण्यायोग्य जुने कपडे, साडी, ड्रेस, चप्पल, व ईतर साहित्य मागविनेत आले होते. शहरातील नागरीकांनी त्यास प्रतिसाद दिला व त्या सर्व वस्तूचे संकलन " माणुसकीचा रथ " या वाहनाद्वारे फिरून करणेत आले. मिळालेल्या सर्व वस्तूचे गरजवंत लोकापर्यत जाणे महत्वाचे होते. त्यासाठी शहरात व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ज्याना घर नाही व छत नाही अश्या उसतोड कामगारांना सदरचे साहित्य वाटप करणेत आले. साहित्य मिळाल्यानंतर त्यांच्या चेह-यावर आनंद पाहण्यासारखा होता.

सदरचे साहित्य वाटपासाठी मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालय प्रमुख तुषार सुपेकर, आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ, संगणक प्रमुख भूषण नवाल, अग्निशमन अधिकारी गोपाळ भोर, सहा. अग्निशमन अधिकारी भरत साळुंके, शहर समन्वयक उदय इगळे, रामनाथ वरखडे, विकास गडाख व ईतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत