कणगर(वेबटीम) राहुरी पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने तालुक्यातील कणगर येथील जि.प.प्राथ.केंद्रशाळा येथे आयोजित कणगर केंद्रातील १४ शाळ...
कणगर(वेबटीम)
राहुरी पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने तालुक्यातील कणगर येथील जि.प.प्राथ.केंद्रशाळा येथे आयोजित कणगर केंद्रातील १४ शाळांचा सांस्कृतिक व विविध गुणदर्शन स्पर्धां कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये कणगर वरघुडेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत घवघवीत यश संपादन केले आहे.
या कार्यक्रमात मोहित बाबासाहेब वरघुडे -इ. ४थी. वैयक्तिक गीत गायन स्पर्धा (बालगट)- प्रथम, कु. माहेरा जाफर सय्यद- इ.२री वक्तृत्व स्पर्धा (किलबिल गट)-प्रथम , गौरी बाबासाहेब गाढे- ४थी. हस्ताक्षर स्पर्धा(बालगट)-द्वितीय, तनवी सतीश नालकर इ.२री हस्ताक्षर स्पर्धा (किलबिल गट)-द्वितीय , रुद्र शिरीषकुमार वरघुडे इ.४थी वक्तृत्व स्पर्धा (बालगट)- तृतीय ,प्रणित संपत भुजाडी- इ.३री,वेशभूषा सादरीकरण (बालगट)-द्वितीय ,सामूहिक गीतगायन स्पर्धा (बालगट) -इ.३री व ४थी.विद्यार्थी-द्वितीय, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा-लेझीम सॉंग (बालगट)-इ.३रीव४थी विद्यार्थी वर्ग यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संसारे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत