राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगरच्या पाठीमागील भागात काही रोहिंग्ये तसेच बांग्लादेशी घुसखोर अवैधरित्या वास्तव्यास अस...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगरच्या पाठीमागील भागात काही रोहिंग्ये तसेच बांग्लादेशी घुसखोर अवैधरित्या वास्तव्यास असल्याचे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील मुथा यांनी माध्यमांतून सांगून प्रशासनाने याची तातडीने दखल घेवून तपास करुन उचित कारवाई करावी अशी मागणी केल्यानंतर आरपीआय शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांनी पत्रकार परिषद घेऊनराहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर परिसरात रोहिंगे तसेच बांगलादेशी अवैधरित्या वास्तव्यास असल्याची खोटी अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ही खोटी अफवा पसरवली असून प्रसादनगर परिसरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असताना विनाकारण समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हंटले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगरच्या पाठीमागील भागात देखिल काही घुसखोर अवैधरित्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे.या घुसखोरांकडे भारतीयत्वाची कोणतीही वैध कागदपञे वा पुरावे नाहित.तथापी काही मतलबी पुढारी आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्ते राजकीय स्वार्थासाठी या घुसखोरांना कागदपञे उपलब्ध करुन देतात.हा एका अर्थाने देशद्रोहाचाच प्रकार आहे.या वसाहतीत राञीच्यावेळी अनेक अज्ञात वाहने व व्यक्तींची ये जा असते.हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचे सुनील मुथा यांनी म्हटले होते. त्यावर पडागळे यांनी हे अंत्यत चुकीच असून या भागाची बदनामी केली जात असल्याचे म्हंटले आहे.
यावेळी राहुरी फॅक्टरी सुन्नी मस्जिदचे अध्यक्ष तैनुर पठाण,राजू थोरात,अतुल त्रिभुवन,बंटी लोंढे,सनी जगताप,फारुख देशमुख,अरबाज शेख,फिरोज पठाण,आदिक पठाण, सामी तांबोळी,सहील शेख,अब्दुल भाई पठाण,मोईनुद्दीन शेख,गनी पठाण,पँथर सेना राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष परवेज पठाण आदींसह प्रसादनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत