देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आज शनिवारी रात्री आठ वाजता दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे आज शनिवारी रात्री आठ वाजता दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला लोणी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथे बाजार तळानजीक बाबुराव पाटील मंदिरासमोर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.
या हाणामारीत काही जण किरकोळ जखमी झाले असून एका तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला आहे.त्याला तात्काळ लोणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच मोठा पोलीस फौजफाटा देवळालीत दाखल होऊन जमावाला घटनास्थळावरून पांगविले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत