राहुरी(वेबटीम) माहेगाव येथे ८ वर्षापूर्वी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असता याबाबत दारूच्या नशेत दुचाकी चालविणा...
राहुरी(वेबटीम)
माहेगाव येथे ८ वर्षापूर्वी झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असता याबाबत दारूच्या नशेत दुचाकी चालविणाऱ्या विरुद्ध राहुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील आरोपीस राहुरी न्यायालयाने विविध कलमानुसार शिक्षा व दंड ठोठाविला आहे.
माहेगाव येथील बाबासाहेब जगन्नाथ हापसे व त्यांचा मुलगा शुभम हापसे हे दोघे दिनांक ३० ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांच्याकडील दुचाकीवरून बोअरवेलचे पाणी ड्रममध्ये भरून आणीत असताना दारूच्या नशेत मुसळवाडीकडे दुचाकीवरून जात असलेल्या शिवनाथ पांडुरंग राव जोराची धडक दिली.या धडकेत शुभम हा खाली पडून त्यास जबर मार लागला व पाय फ्रॅक्चर झाला. याबाबत राहुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असता सरकारी पक्षाकडून ७ साक्षीदार तपासण्यात आले.यामध्ये तपासी अधिकारी म्हणून काम बघत असलेले सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबल अनिल गायकवाड यांची साक्ष ही महत्वाची ठरली.
याबाबत राहुरी न्यायालयाचे कोर्ट नंबर ३ चे न्यायाधीश मयुरसिंग गौतम यांनी आरोपी शिवनाथ राव याला दोषी धरून त्यास भादंवि कलम २७९ करिता ६ महिने शिक्षा व १ हजारबरुपये दंड तसेच कलम ३३७ करिता २ महिने शिक्षा व ५०० रुपये दंड मोटर वाहन वाहन कायदा १८४ करीत ६ महिने शिक्षा व १ हजार रुपये दंड तसेच मोटार वाहन कायदा १८७ करिता २ महिने शिक्षा व ५००० रु दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर दंडाची रक्कम साक्षीदार शुभम हापसे यास नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी असाही हुकूम करण्यात आला आहे. दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने सरकार वकील सविता गांधले- ठाणगे यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत