देवळाली प्रवरात नव्या वर्षात साई नामाचा गजर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात नव्या वर्षात साई नामाचा गजर

देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील श्री साई प्रतिष्ठाणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात  गुरुवार दिनांक २ ते ९ जानेवारी २०२...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



येथील श्री साई प्रतिष्ठाणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात  गुरुवार दिनांक २ ते ९ जानेवारी २०२५ दरम्यान श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


   गेल्या १० वर्षापासून श्री साई प्रतिष्ठान देवळाली प्रवरा व देवळाली ग्रामस्थांच्यावतीने महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या अधिपत्याखाली साई पारायण व कीर्तन महोत्सवचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या ११ व्या साई उत्सवास २ जानेवारी रोजी होणार असून सांगता ९रोजी होणार आहे . गुरुवार  २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता कलश पूजन व ग्रंथ पूजन होईल. त्यानंतर पारायण वाचनास सुरुवात होणार आहे. या या उत्सवानिमित्त  सकाळी ४.३० वा, काकड आरती, सकाळी ८ ते १२ साई सच्चरित्र पारायण ,माध्यन्ह आरती ,सायंकाळी  ४ वाजता हरिपाठ  , सायंकाळी  ६ वाजता धूप आरती व त्यानंतर  ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कीर्तन, शेज आरती व नंतर महाप्रसाद  होईल. पारायण व्यासपीठ चालक गणेश महाराज मुसमाडे हे आहेत.उत्सवाच्या काळात हजारो भाविकांसाठी सकाळी नाश्ता तर दुपार व रात्री महाप्रसादाचे अन्नदात्यांच्या सहकार्याने आयोजन केले आहे





कीर्तन महोत्सवानिमित्त ०२ जानेवारी रोजी बाबानंद महाराज वीर, ०३ जानेवारी रोजी गणेश महाराज वाघमारे(ओझरकर), ४ जानेवारी रोजी किशोर महाराज दिवटे(जालना), ५ जानेवारी रोजी आदिनाथ महाराज शास्त्री(तारकेश्वर गड), ६ जानेवारी रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम(आळंदी), ७ जानेवारी रोजी देविदास महाराज म्हस्के(नेवासा), ८ जानेवारी रोजी पांडुरंग महाराज वावीकर यांचे कीर्तन होणार आहे. ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता ग्रंथ मिरवणूक व ६ वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम होईल. 


९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ उद्धव महाराज मंडलिक(नेवासेकर) यांचे काल्याचे कीर्तन व  त्यानंतर भव्य महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.


तरी या पारायण सोहळ्यास व कीर्तन महोत्सवास आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत