राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी पोलिसांकडून गेल्या सहा ते सात दिवसांपासून विनाक्रमांक दुचाकींवर कारवाईची मोहीम राहुरी शहरात सुरू असताना आज गुर...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी पोलिसांकडून गेल्या सहा ते सात दिवसांपासून विनाक्रमांक दुचाकींवर कारवाईची मोहीम राहुरी शहरात सुरू असताना आज गुरुवारी पोलीस पथकाने राहुरी फॅक्टरी परिसरात पोहोचून श्रीरामपूर चौकात विनाक्रमांक शेकडो दुचाकींवर कारवाई केली आहे.अचानक सुरू केलेल्या या कारवाईने दुचाकी स्वारांची चांगलीच धांदल उडाली आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार फुलारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गीते, ठोंबरे, बाबासाहेब शेळके शेळके, प्रवीण बागुल, फुलमाळी , जालिंदर धायगुडे होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने विनाक्रमांक दुचाकींवर धडक मोहीम राबविली. सकाळी ९ ते ११ या वेळेत ही कारवाई सुरू होती.
सदर मोहिमेदरम्यान ३२ दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. त्यांच्यावर वर १६ हजार ७० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्या पैकी ३० गाडी मालकाच्या ताब्यात परत नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या. उर्वरित २ गाड्यांची कागदपत्रे अद्याप पर्यंत सादर न केल्याने सदर गाड्यांच्या मालकी हक्काबाबत खात्री करून पुढील कारवाई करत आहे.
वाहतूक ठप्पच पण बघा!
पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले.मात्र या चौकात नेहमीच वाहतूक ठप्प होत असते.शिर्डी व शिंगणापूर भाविकांना वाहतूक ठप्पचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी वाहतूक ठप्प न होता प्रवासी वर्गाला त्रास होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आखावी किंबहुना ट्रॅफिक पोलीस, सिग्नल व्यवस्था करावीअशी अपेक्षा शहरातील नागरिक व प्रवासी वर्गातून व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत