राहुरी फॅक्टरीत एप्रिलमध्ये संत महिपती महाराज भव्य फिरता नारळी सप्ताह दररोज नामांकित किर्तनकारांची कीर्तन, हजारो भविकांना दोन वेळेस महाप्रसाद सप्ताह नियोजनाची प्राथमिक बैठक संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत एप्रिलमध्ये संत महिपती महाराज भव्य फिरता नारळी सप्ताह दररोज नामांकित किर्तनकारांची कीर्तन, हजारो भविकांना दोन वेळेस महाप्रसाद सप्ताह नियोजनाची प्राथमिक बैठक संपन्न

  राहुरी फॅक्टरी:- प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत कवी महिपती महाराज ५९ वा फिरता नारळी सप्ताह यंदा राह...

 राहुरी फॅक्टरी:-


प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील संत कवी महिपती महाराज ५९ वा फिरता नारळी सप्ताह यंदा राहुरी फॅक्टरी येथे  एप्रिल  महिन्यात आयोजित करण्यात येणार असून या सप्ताहसाठीची प्राथमिक बैठक आज राहुरी फॅक्टरी येथील दत्त लॉन्स येथे संपन्न झाली.

 
संत कवी महिपती महाराज फिरता नारळी सप्ताह नियोजनासाठी आज पार पडलेल्या प्राथमिक बैठकीत ह.भ.प बाळकृष्ण खांदे,किशोर महाराज शेळके,राजेंद्र चव्हाण, विलास मुसमाडे,सीताराम नालकर,दत्ता पाटील गागरे,अनिल महाराज टेकूडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.



प्रसंगी प्रशांत काळे,सुनील कराळे,नारायण शेळके, ज्ञानेश्वर मोरे,अविनाश गायके, ,प्रदीप गरड, सोपानराव घोरपडे, वसंत बर्डे, भास्कर कोळसे, संजय काळे, शामकांत खर्डे, अमित देशमुख, महेश रोटे, संगम काळे, महेश सिनारे, प्रकाश कराळे, संदीप तरवडे,  बाबासाहेब कदम, आदींसह परिसरातील नागरिक व भाविक भक्तगण उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन अजिंक्य गायकवाड यांनी केले.

*नामांकित कीर्तनकारांची हजेरी*

सप्ताह काळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अक्रूर महाराज साखरे, विकासानंदजी महाराज मिसाळ,उद्धव महाराज मंडलिक, योगीराज महाराज गोसावी, देविदास महाराज आडभाई, तुकाराम बाबा जेऊरकर आदींसह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न होणार आहे. संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताहाराबाद येथील मठाधिपती ह.भ.प अर्जुन महाराज तनपुरे यांचे काल्याचे किर्तनाने या सप्ताहाची सांगता  होणार आहे.

 

*हजारो भाविकांना महाप्रसाद*

सप्ताह काळात दररोज दुपारी व संध्याकाळी हजारो भाविकांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी परिसरातील दानशूर नागरिकांचे सहकार्य लाभणार आहे.


*दानशूरांनी व सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज*

राहुरी फॅक्टरी येथे भव्य दिव्य सप्ताह होत असल्याने समाजातील दानशूर मंडळी, अन्नदाते, सामाजिक संघटना यांनी या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी पुढे गरजेचे आहे.

*भव्य दिव्य वॉटरफुफ मंडपाची उभारणी*

सप्ताहसाठी डॉ. तनपुरे साखर कारखाना क्लब हाउस मैदानावर भव्य दिव्य वॉटरप्रूफ मंडप उभारणी करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत