राहुरी फॅक्टरी:- राहुरी फॅक्टरी येथे एसबीआय बँकेचे एटीएमच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली आहे., १८ जानेवारी रोजी एसबी...
राहुरी फॅक्टरी:-
राहुरी फॅक्टरी येथे एसबीआय बँकेचे एटीएमच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली आहे.,
१८ जानेवारी रोजी एसबीआय एटीएम मधील एटीएमच्या जवळपास 14 बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.
यासंदर्भात राहुरी पोलीस स्टेशन येथे 31/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्र संजय ठेंगे यांनी तात्काळ तपास पथक नेमले होते. सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम यांनी तांत्रिक विश्लेषण करून व गोपनीय माहिती घेऊन आरोपी निष्पन्न करून आरोपींना पोलीस पथकाने नाशिक येथून ताब्यात घेऊन अटक करून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकोन्स्टेबल बाबासाहेब शेळके, पोलीस नाईक प्रवीण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, अमोल भांड यांनी केलेली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण बागुल हे करत आहेत.
'हे' आहेत आरोपी
प्रवीण मोतीराम अंभोरे( रा. सस्ती तालुका पतुर जिल्हा अकोला ), भगवान विश्वनाथ सदार(रा. चतारी,तालुका पतुर, जिल्हा अकोला , राकेश गया प्रसाद यादव (रा। नांदूर गाव, नाशिक)
नाशिक गुन्हे शाखा युनिट 2ची मदत
राहुरी पोलिसांना आरोपी पकडणेकामी नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक हिरे, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवळी, नितीन फुलमाळी, वाल्मीक चव्हाण, जितेंद्र वजीरे, यांनी मदत केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत