जामखेड(वेबटीम) संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे साप्ताहिक पोलीस वारंट दिनदर्शिका २०२५ चे स्वागत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांन...
जामखेड(वेबटीम)
संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणारे साप्ताहिक पोलीस वारंट दिनदर्शिका २०२५ चे स्वागत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काल दि. २२ जानेवारी रोजी केले आहे .
प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस वारंट दिनदर्शिका प्रकाशित झाले आहे यामध्ये दिनदर्शिका२०२५ चे मुखपृष्ठ म्हणून विधानपरिषदचे सभापती प्रा. ना.राम शिंदे हे आहेत.
खर्डा येथून प्रकाशित होणाऱ्या व राज्यातील सर्व जिल्ह्यात वितरित होणाऱ्या पोलीस वारंट दिनदर्शिकेचे स्वागत काल बुधवारी दि २२ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे. यावेळी पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड,व पोलीस वारंटचा स्टाफ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
साप्ताहिक पोलीस वारंट हे गुन्हेगारसह विविध विषयांचा वेध घेणारे साप्ताहिक आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होते संपूर्ण महाराष्ट्राचे वेध घेणारे साप्ताहिक पोलिस वारंट, गुन्हेगारीचे वेध घेणारे ,सामाजिक प्रश्नावरचे वेध,राजकीय विषयावर वेध घेणारे साप्ताहिक, गोरगरीब, दीनदलित ,बहुजन ,आदिवासी अन्याय अत्याचार त्याचे प्रश्न मांडणारे साप्ताहिक पोलीस वारंट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत