राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राहुरी तालुका युवक अध्यक्षपदी सुहास उर्‍हे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राहुरी तालुका युवक अध्यक्षपदी सुहास उर्‍हे

  राहुरी(वेबटीम)  राहुरी तालुका राष्ट्रवादी अ.प. गटाने पदाधिकार्‍यांच्या बैठकीत विजय निर्धार करीत युवक संघटनेला बळकटी देण्यासाठी युवक तालुका...

 राहुरी(वेबटीम)



 राहुरी तालुका राष्ट्रवादी अ.प. गटाने पदाधिकार्‍यांच्या बैठकीत विजय निर्धार करीत युवक संघटनेला बळकटी देण्यासाठी युवक तालुका अध्यक्ष म्हणून सुहास उर्‍हे यांची निवड घोषित करण्यात आली.

राहुरी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक अध्यक्षपदी उर्‍हे यांच्या निवडीचे पत्र शिर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या उपस्थित देण्यात आला. युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण, प्रदे सचिव फारुख पटेल, जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुडे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक सावंत,  तालुका अध्यक्ष दिलीप जठार, अजित कदम, अमृत धुमाळ, जिल्हा सचिव सचिन डेरे, सुनिल भट्टड, निलेश शिरसाठ आदींच्या हस्ते पत्र देत सदर निवड घोषित करण्यात आली. निवडीनंतर नूतन युवक अध्यक्ष उर्‍हे पाटील यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त यश मिळविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून वंचित, गोरगरीब व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उर्‍हे पाटील यांनी दिले.

जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, नवनाथ मुसमाडे, प्रशांत हारदे, अरुण पानसंबळ, पप्पू बाचकर आदींसह विविध राजकीय क्षेत्रातून उर्‍हे पाटील यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत