निवडणूक संगणक चालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निवडणूक संगणक चालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

अहिल्यानगर(वेबटीम) अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मतदार मदत केंद्रावरील निवडणूक डाटा एंट्री ऑपरेटर यांनी मानधन वाढ व्हावी यासाठी जिल्हाधिकारी त...

अहिल्यानगर(वेबटीम)



अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मतदार मदत केंद्रावरील निवडणूक डाटा एंट्री ऑपरेटर यांनी मानधन वाढ व्हावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदानाद्वारे मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार प्रशांत गोसावी यांनी निवेदन स्वीकारले.

      निवेदनात म्हंटले आहे की, निवडणूक डाटा एंट्री ऑपरेटर सन २०१७ पासुन प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयास ०१ असे एकुण १५ मतदार सहायता केंद्र ऑपरेटर फॉर्म नमुना ६, ७, ८ ची डाटा एंट्री वेळेत पुर्ण करणे, दैनंदिन अहवाल तयार करणे, पदवीधर व शिक्षक विधानपरिषदेचे मतदार डाटा एंट्री करणे तसेच इतर निवडणुक अनुषंगिक कामे रात्रंदिवस सुट्टीच्या दिवशीही कोणतेही कारण न देता करत आहोत. सद्य स्थितीत सदर मानधन म्हणुन दरमहा एकोणीस हजार रुपये याप्रमाणे मानधन मिळते. परंतु सदरचे मानधन हे महागाईचा व कामाचा विचार करता अत्यंत तुटपुंजे असे आहे. या महागाईच्या काळात पुरेसे मानधन नसल्याने कुटुंबाचे पालनपोषण करणे फार कठीण होत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत इतर शासकीय कर्मचारी यांचेप्रमाणे अतिकालीन भत्ता मिळावा अशा विविध मागण्या केल्या आहेत.

      निवेदनावर रोहन नोमुल, रोहित खापरे, प्रमोद वाघमारे, दिपाली औटी, संदिप पाळंदे, इरफान शेख, आकाश माने, सागर गरुड, विनय कवळे, ज्योती आव्हाड, चंद्रकांत कहार, प्रदिप जत्ती, विशाल पाबळ, निलेश अडाले, अजय खंडीझोड यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत