जामखेड प्रतिनिधी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारा "बापमाणूस' म्हणजे वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे हे होय. त्यांच्या कार्...
जामखेड प्रतिनिधी
राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारा "बापमाणूस' म्हणजे वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे हे होय. त्यांच्या कार्याची ख्याती व नाव महाराष्ट्र सह जगभर होते.स्व.धर्मवीर आनंदराव दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब हे वारसा चालवत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी " भगव्या सप्ताहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सभासद नोंदणी करुन पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करावे.असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख प्राध्यापक कैलास माने यांनी केले.
दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्राध्यापक कैलास माने यांच्या हस्ते तसेच शिवसैनिकांच्या उपस्थित वंदनीय स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख अभिजीत माने, शहरप्रमुख देविदास भादलकर, दलित आघाडीचे प्रमुख गौरव सदाफुले, उपप्रमुख पांडुरंग समुद्र, किसान आघाडीचे तालुका प्रमुख वाळुंजकर तात्या,भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे, प्रविण बोलभट, आण्णासाहेब ढवळे,दत्ता पवार, आण्णासाहेब जाधव,सावता जाधव, बाळासाहेब साळवे,सागर टकले, कबीर घायतडक, सचिन चव्हाण आदी शिवप्रेमी व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत महाराज निकम यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग समुद्र यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत